पुणे (वृत्तसंस्था) : जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातली पहिल्या टप्प्यातल्या कामांना मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात दिली. तीर्थक्षेत्राचे जतन, आणि संवर्धन, परिसर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन आदी विकासकामांसाठी ३४९ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.