नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तयार केले कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आणि त्याचं हित जपणारेच आहेत अशी ठाम भूमिका केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज पुन्हा एकदा मांडली. दिल्लीत अजूनही या कायद्याविरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसद सदनाबाहेर मध्यामंशी बोलताना तोमर यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. केंद्र सरकारने या कड्या बाबत सर्व शेतकरी संघटनांशी चर्चा केली असून, अजूनही या कायद्यातील प्रत्येक तरतुदीच्या मुद्द्याच्या आधारे कोणाला चर्चा करायची असल्यास सरकारची तयारी आहे, अशी तोमर यांनी यावेळी सांगितल.