नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून त्याबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचं केंद्रीय पथक आज केरळच्या दौऱ्यावर जात आहे. हे पथक केरळ सरकार कोरोना प्रतिबंधासाठी करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेईल आणि तातडीनं कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी आणखी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारशी विचारविनिमय करेल. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र अर्थात एन सी डी सी च्या संचालकांच्या नेतृत्वाखाली हे पथक केंद्र सरकारतर्फे पाठविण्यात येत आहे.