पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त

177

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी समाधान व्यक्त केलं आहे. व्यावसाय सुलभेता म्हणजेच इज ऑफ डुईंग बिसनेस अंतर्गत होत असलेल्या सुधारणांमुळे भारत इनोव्हेशन हब म्हणून उदयाला येईल असं गोयल यांनी म्हटलं आहे.

गोयल यांनी काल  पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क महानियंत्रकांच्या मुंबई इथल्या कार्यालयाला भेट दिली. पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्कसाठी पोषक वातावरण निर्मिती करता यावी याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले.