मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्या सर्वांना उपनगरीय रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे.वकिलांना उपनगरीय रेल्वेनं प्रवास करण्यास परवानगी देण्याबाबतची याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही सूचना केली. यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली.लसीकरण झालेल्या वकिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र, त्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवाचे लसीकरणाविषयीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.या प्रमाणपत्राची खातरजमा करून रेल्वे प्रशासन वकिलांना मासिक, त्रैमासिक व सहामाही रेल्वे पास देईल.