One of the HSC exam centre in Bhave School Sadashiv Peth on the first day of the exams. Express Photo by Sandip Daundkar,21.02.2018, Pune

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील आज आणि उद्या होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आरोग्य सेवा संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी काल ही माहिती दिली. अर्ज भरलेल्या प्रत्येक उमेदवाराला परिक्षेसाठी बसण्याची संधी नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार मिळाली पाहिजे म्हणून सर्व उमेदवारांच्या हिताचा विचार करुन लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.डॉक्टर पाटील यांनी सांगितले की ही परीक्षा घेण्यासाठी करार केलेल्या कंपनीने परीक्षेची पूर्व तयारी पूर्ण न झाल्यामुळं काल सायंकाळी परीक्षा घेण्यासाठी असमर्थता दर्शवली.त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परीक्षा पुढ ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.