मुंबई (वृत्तसंस्था) : नेहरू युवा केंद्रांच्या महाराष्ट्र आणि गोवा शाखेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत राजभवन इथं प्रदान करण्यात आले. युवा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुणे जिल्ह्यात सुंदरबन न्हावरे इथल्या ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेला 1 लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत क्षेत्रातल्या योगदानाबद्दल गायिका सुनाली राठोड आणि गायक रुपकुमार राठोड यांना सन्मानित करण्यात आलं. सामाजिक कार्य, पत्रकारिता, शासकीय सेवा या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या इतर काही मान्यवरांनाही राज्यपालांनी सन्मानित केलं. नेहरू युवा केंद्रांनी ग्रामीण तसेच आदिवासी भागांच्या उन्नतीसाठी कार्य करावं असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.