मुंबई (वृत्तसंस्था) : सणासुदीमुळे विमानतळावर प्रवांशाची वाढलेली गर्दी तसंच गुप्तचर विभागानं दिलेला सावधगिरीचा इशारा या पार्श्वभूमीवर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सर्व सुरक्षा तपासण्या तसंच कोविड प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले असून प्रवाशांचा खोळंबा होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे मुंबई विमानतळावर सध्या बंद असलेलं टर्मिनल-एक देखील येत्या २० ऑक्टोबर पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसिद्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.