नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्यानं खाद्य तेल आणि तेलबियांच्या साठवणुकीवर निर्बंध लादले आहे. साठ्याची मर्यादा ठरविण्याचे अधिकार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहे. परवापासून लागू झालेले हे निर्बंध पुढच्या वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत लागू राहतील. ज्यांच्याकडे या मर्यादेपेक्षा अधिक साठा आहे त्यांना विभागाच्या वेबसाइटवर माहिती जाहीर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामुळं खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. मोहरीचं तेल आणि तेलबियांचे कमोडिटी बाजारातले व्यवहारही स्थगित करण्यात आले आहेत.