नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिर्झव्ह बँकेनं आपलं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं. यानुसार बँकेच्या पतधोरण समितीनं व्याजदरात कोणतेही बदल न करता ते सध्याप्रमाणेच कायम ठेवायचा निर्णय घेतला आहे. यामुळे बँकेचा रेपो दर ४ टक्के तर रिव्हर्स रेपो दर ३ पूर्णांक ३५ शतांश टक्क्यावर, आणि एमएसएफ अर्थात स्थायी किरकोळ सुविधा दर सव्वाचार टक्क्यावर कायम असेल. अलिकडेच पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्क आणि व्हॅटमध्ये कपात झाल्यानं, येत्या काळात मागणी आणि खरेदी क्षमता वाढेल अशी आशा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी यावेळी व्यक्त केली. चालू आर्थिक वर्षात विकासदर साडेनऊ टक्के राहील, तर महागाई दर ५ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील असं दास यांनी सांगितलं.