नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. काल २६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी ३३ लाख २० हजार ५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल १४ हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात २ लाख १४ हजार ९०० एक्टीव रुग्ण आहेत. आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ६३ शतांश टक्के आहे. काल १८१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळीची संख्या ४ लाख ५० हजार ९६३ झाली आहे.