नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर असतील. लेह इथल्या विमानतळावर मानवंदना स्विकारल्यावर सिंधु दर्शनासाठी ते सिंधु घाटावर रवाना होतील. लडाखची ही त्यांची दुसरी भेट आहे. सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर म्हणून राष्ट्रपती द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर उद्या पुष्पहार अर्पण करतील.राष्ट्रपती द्रास मधल्या सैंनिकांसोबत दसऱ्याचा सण देखील साजरा करणार आहेत.