नवी दिल्ली : 118 नवी कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्यासाठी अर्जदारांच्या मंजूर केलेल्या यादीमध्ये नक्षलप्रभावित 16 जिल्हे, नक्षलवादाने अति प्रभावित 6 जिल्हे, 25 किनारी जिल्हे, 17 आकांक्षी जिल्हे, 3 इशान्येकडचे जिल्हे आणि 2 जम्मू-काश्मीरमधल्या जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधितांना इरादा पत्र मंजूर करण्यात आली आहेत. स्वयंसेवी संस्था, खाजगी आणि सार्वजनिक शैक्षणिक संस्था, कृषी विज्ञान केंद्रातल्या अर्जदारांना मंजुरी देण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यात ही कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स कार्यान्वित होतील अशी अपेक्षा आहे.
देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सविषयी
कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स ही छोटी (कमी शक्तीची) एफएम रेडिओ केंद्रं आहेत. संबंधित विभागाच्या भौगोलिक रचनेनुसार 10-15 किलोमीटर त्रिज्या परिसर याची व्याप्ती असते. कृषी विषयक माहिती, जनकल्याणासाठीच्या सरकारच्या योजना, हवामानाचा अंदाज बाबींविषयी माहिती देण्यात कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सची महत्वाची भूमिका आहे.