मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिकी यात्रा व्हावी अशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची इच्छा असून, शासन निर्णयाच्या अधीन राहून वारी व्हावी, याकरता जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. कार्तिकी यात्रा भरवण्यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कार्तिकी वारीतला एकादशीचा मुख्य सोहळा १५ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिरणी मंदिरात 1985 पासून अर्पण केलेल्या सुमारे 27 किलो वजनाच्या सोन्याच्या वस्तू, छोटे दागिने वितळवून त्यातून नवीन अलंकार घडवण्यासाठी शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे  परवानगी मागितली जाणार आहे अशी माहितीही औसेकर महाराज यांनी दिली.