मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या आणि महाप्रित कंपनीच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांना ग्रामीण भागात उद्योग, स्वयंरोजगार यासाठी चालना मिळावी, अर्थसहाय्य उपलब्ध व्हावं, असं मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. ते काल नाशिक इथं महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यामातून बोलत होते. महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन भाजीपाला, फळे आदी प्रक्रिया उद्योग व विक्रीसाठी १०० महिला बचतगटांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बायोगॅस, फ्लाय ॲशपासून विस्तारित होणारे प्रकल्प यांनाही आर्थिक प्रोत्साहन मिळाल्यास या क्षेत्रातही रोजगारासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असंही मुंढे म्हणाले.