नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलंपिक सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रतिष्ठेच्या लॉरिओ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. या विभागात नामांकन मिळालेला नीरज पहिला भारतीय आहे. गेल्यावर्षी टोक्यो ऑलंपिक स्पर्धेत नीरजनं 87 पूर्णांक 58 मीटर अंतर लांब भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं होतं. नीरजसह रशीयाचा टेनिसपटू डॅनिअल मेदवेदेव, ब्रिटनची टेनिसपटू एम रँडूकानू तिहेरी उडीपटू युलिमर रोहास,  जलतरणपटू अरिअनें आदींचा या नामांकनात समावेश आहे.