नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ शी मुकाबला करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं आयुर्वेदिक, सिद्ध, होमियोपॅथी औषधं विकसित करणं महत्वाचं तर आहे, शिवाय प्रभावी विपणनाच्या माध्यमातून औषधं तळागाळातल्या लोकांपर्यंत कशी पोचतील यावर देखील भर देणं गरजेचं असल्याचं आयुष मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. अॅमेझॉन या संकेतस्थळावर आयुर्वेदिय उत्पादनं एकाच ठिकाणी मांडण्याच्या उपक्रमाची सुरुवात त्यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. या आयुर्वेदिय उत्पादनामध्ये विविध प्रकारचे रस, तेलं, त्वचा संवर्धन तसंच प्रतिकार क्षमता वाढवणारी उत्पादन आहेत. ही उत्पादन छोटे उद्योजक आणि स्टार्ट अप बँन्ड्सनी तयार केलेली आहेत. स्त्रियांचे आरोग्य, मानसिक स्थिरता, वजन नियंत्रण तसंच वेदना निवारण अशा विविध बाबतीत उपयुक्त ठरणारी ही आयुर्वेदिक औषधं आता एकाच ठिकाणी पाहायला मिळतील आणि खरेदी करता येतील.