मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या १३ ते १५ मे दरम्यान उदयपूर येथे नियोजित काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरातल्या राजकीय प्रस्तावाबाबतच्या समितीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश केला आहे. काँग्रेस सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला असून, पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे.
या समितीत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे निमंत्रक, तर गुलाम नबी आझाद, अशोक चव्हाण, एन. उत्तम कुमार रेड्डी, डॉ. शशी थरूर, गौरव गोगोई, सप्तगिरी शंकर उलाका, पवन खेरा व डॉ. रागिणी नायक यांचा समावेश आहे. ही समिती चिंतन शिबिरातले राजकीय प्रस्ताव तयार करण्याचं, तसेच याबाबतच्या विचारमंथनाचं नियोजन करणार आहे.