नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषदेने आता दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवर्गातल्या शहरांवर लक्ष केंद्रित करून तिथल्या नव उद्योजकांना भांडवल पुरवठा आणि क्षमता वर्धन करणं, तसंच स्टार्ट अप्स ना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर द्यावा, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषदेच्या चौथ्या बैठकीची अध्यक्षता करताना ते बोलत होते. परिषदेचे सदस्य राज्याराज्यांमधल्या नव उद्योजकांच्या तसंच विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या उद्योगकल्पनांना प्रोत्साहन देत असतात . नव उद्योजकांसाठी पोषक वातावरण तयार करणं, स्टार्ट अप्समधली मूळ उद्योजकाची मालकी कायम राखणं, त्यांची नोंदणी, सूचिबद्धता यावर देखरेख करणं, तसंच देशात नवोन्मेषाची केंद्रे उभारणी, इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली