नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी आज ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयासमोर दिल्लीमध्ये चौकशीसाठी हजेरी लावली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही चौकशी झाली. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांसह सत्याग्रह यात्रा काढून राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते.

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुलजी गांधी यांना ईडीनं नोटीस पाठवल्याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधात  प्रदेश काँग्रेसनं आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निषेध केला.नागपुरातही ईडी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करून केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला.