नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यटन क्षेत्रात सहकार्य दृढ करण्यासाठी भारत आणि फिनलँड यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे.
पर्यटन, माहितीची देवाणघेवाण, ज्ञान, तसंच पर्यटन क्षेत्रातील तज्ञता इत्यादी बाबतीत उभयपक्षी सहकार्य वाढवण्याकरता सहकार्याच्या नात्याचा पाया प्रस्थापित करणं हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.