नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १९९ कोटीपेक्षा जास्त लशीचे मात्रा देण्यात आल्या. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयानं सांगितलं की, देशात काल ११ लाख ७६ हजाराहून जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत. समकालावधीत देशात काल २० हजार १३९ नवीन कोविडचे रुग्ण आढळले. देशात सध्या १ लाख ३६ हजार एक्टीव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४९ शतांश टक्क्यावर आहे. देशात काल दिवसभरात एकूण १६ हजार ४८२ लोक बरे झाले असून, एकूण बरे होण्याचा आकडा चार कोटी ३० लाख २८ हजारांवर पोहोचला आहे. मंत्रालयाने सांगितले की साप्ताहिक सकारात्मकता दर ४ पूर्णांक ३७ शतांश टक्के आहे आणि दैनिक सकारात्मकता दर ३ पूर्णांक १० शतांश टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण ८६ कोटी ८१ लाख कोविड चाचण्या घेण्यात आल्या. गेल्या चोवीस तासांत तीन लाख ९४ हजारांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या.