मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यात आजरा परिसरात गेल्या काही दिवसापासून टस्कर हत्तीचा वावर वाढला आहे. गवसे इथं काल रात्रीच्या सुमाराला टस्करनं धुडगुस घालत शेडसह काही गाड्यांचं नुकसान केलं. टेक नावाच्या शेतात रात्री अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत ऊस आणि भात पिकातही त्यानं धुडगूस घातला. काही काळ टस्कर आजरा आंबोली रस्त्यावरही ठाण मांडून उभा होता.