Mumbai: Shiv Sena chief Uddhav Thackeray (R) and State PWD minister Eknath Shinde during a press conference in Mumbai on Saturday. PTI Photo by Mitesh Bhuvad(PTI7_15_2017_000089B)

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याच्या  प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एका वृत्त वाहिनीवर ते बोलत होते. नवी मुंबईतल्या नियोजित विमानतळाला स्थानिक नेते दीना बामा पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावालाही  मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. हे प्रस्ताव केंद्र शासनाच्या मंजुरी साठी पाठवले जाणार असून या मंजुरीनंतर  विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका आणि नगरपालिका यांचंही नामांतर करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनीही गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आपला सत्कार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आमदार अब्दूल सत्तार यांच्या पुढाकारानं हे शक्तीप्रदर्शन आणि सत्कार झाला. आमदार सत्तार तसंच आमदार संदीपान भुमरे यांचं भाषण यावेळी झालं.