नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार क्षेत्रात आज पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या वेळी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून एक नागरिक मृत्युमुखी पडला आहे. या घटनेत तीन जवानासहीत आठ जण जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सहा घरांचही नुकसान झालं आहे. पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेजवळील सैनिकी चौकीवर तसंच नागरी वस्तीवर स्वयंचलित हत्यारानं गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा केला. भारतीय सैन्यानं गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं असून, पाकिस्तानी सैनिकही जखमी झाले आहेत.