दोन ठिकाणी 14 चित्रपट दाखवले जाणार ‘पडोसन’ आणि ‘चलती का नाम गाडी’ हे चित्रपट ‘जुने क्लासिक’ विभागांतर्गत दाखविले जाणार

नवी दिल्ली : 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मध्ये खुल्या चित्रपटगृहात दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. यावर्षी 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान इफ्फीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जाईल. दरवर्षी इफ्फी सिनेरसिकांसाठी खुल्या चित्रपटगृहात सिनेमांचे खेळ आयोजित करत असते.

यावर्षीच्या अशा खेळांची संकल्पना ‘सिनेमाचा आनंद’ अशी असेल. विनोदी शैली संबंधित सदाबहार चित्रपट प्रकारामध्ये तसेच इंडियन पॅनोरमा विभागात दाखवले जातील. यावर्षी चित्रपटांचे आयोजन जॉगर्स पार्क ( अल्टीन्हो, पणजी) आणि मिरामार बीच, पणजी या दोन ठिकाणी 21 ते 27 नोव्हेंबर दरम्यान केले जाईल. जॉगर्स पार्कमध्ये विनोदी चित्रपट तर मीरामार बीचवर इंडियन पॅनोरमा विभागातील निवडक चित्रपट दाखवले जातील. हे चित्रपट सर्वांसाठी नोंदणीशिवाय खुले असतील.

जॉगर्स पार्क ( अल्टीन्हो, पणजी)  येथील चित्रपट

  1. चलती का नाम गाडी (1958)
  2. पडोसन(1968)
  3. अंदाज अपना अपना (1994)
  4. हेराफेरी (2000)
  5. चेन्नई एक्स्प्रेस (2013)
  6. बधाई हो (2018)
  7. टोटल धमाल (2019)

मिरामार बीच येथे दाखविण्यात येणारे चित्रपट

  1. नकोम-इआ कुम्पासार {Nachom-ia Kumpasar (Konkani)}
  2. सुपर 30 (हिंदी)
  3. आनंदी गोपाळ (मराठी)
  4. उरी-द-सर्जिकल स्ट्राईक (हिंदी)
  5. हेल्लारो (गुजराती)
  6. गल्ली बॉय (हिंदी)
  7. F2-फन ॲण्ड फ्रस्ट्रेशन (तेलगु)