नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केला आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ कर्नाटक राज्यातल्या बंगळुरू इथं आयोजित एका सभेत ते बोलत होते.  नागरीकत्व बहाल करण्यात केंद्र सरकार कसलाही भेदभाव करत नाही, असंही ते म्हणाले.

वचननाम्यात सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकार सर्व नागरिकांना सामान फायदे देत आहे. काँग्रेस दुटप्पी वागत आहे, हा कायदा २ हजार साली काँग्रेसनेच आणला होता आणि आता या कायद्याला विरोध करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.