‘सक्षम अभियान 2020’चे उद्घाटन
मुंबई : जनतेने उद्याच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंधनाचा काटकसरीने वापर करुन पर्यावरण संवर्धनाच्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
पेट्रोलियम पदार्थाच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेद्वारे (PCRA) आयोजित ‘सक्षम अभियान 2020′ (संरक्षण क्षमता महोत्सव) कार्यक्रमाचे उद्‌घाटन श्री.भुजबळ यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.
श्री.भुजबळ म्हणालेविकासाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाची व राज्याची ऊर्जेची वाढती गरज भागविण्यासाठी पेट्रोलियम पदार्थाच्या आयातीवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत ऊर्जा साधनांचा काटकसरीने वापर देशाच्या व राज्याच्या शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचे पाऊल ठरते. राज्य सरकार पेट्रोलियम पदार्थांना पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जेचा व इतर साधनांचा वापर करण्यासाठी उपाययोजना करीत आहेत.
‘सक्षम अभियान 2020’, ‘इंधन अधिक ना खपाएंआओ पर्यावरण बचाए’ हे घोषवाक्य प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. या अभियानांतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा यासाठी निश्चितच उपयोग होईल.
पीसीआरए संघटनेच्या ‘सक्षम अभियान 2020′ अभियानाला श्री भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या. ‘सक्षम अभियान 2020′ (संरक्षण क्षमता महोत्सव) हे अभियान दि. 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2020 या कालावधीत सुरु राहणार असून या अभियानाचे ‘इंधन अधिक ना खपाएंआओ पर्यावरण बचाए’ हे घोषवाक्य आहे.
परिवहन संस्था पुरस्कार
 
यावेळी श्री.भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील दुसरा उत्कृष्ट राज्य परिवहन संस्था पुरस्कार बेस्टचे मुख्य प्रबंधक श्री.लाड यांना आणि बेस्टच्या बांद्रा डेपोला उत्कृष्ट डेपो पुरस्कार देण्यात आला. राज्य स्तरावरील उत्कृष्ट परिवहन पुरस्कार मुरुड (रायगड)पंचवटी (नाशिक)यवतमाळश्रीवर्धन (रायगड)पेण (रायगड)परभणी, पीएमपीएमएल पुणेच्या बालेवाडी या डेपोंना उत्कृष्ट डेपो पुरस्कार देण्यात आले.
श्री.भुजबळ यांच्या हस्ते पीसीआरएच्या सक्षम-संरक्षण क्षमता महोत्सव या व्हॅनचेही उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठकइंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे प्रादेशिक समन्वयक सुजीत रॉयहिंदूस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.चे पश्चिम विभागाच्या विक्री विभागाचे मुख्य व्यवस्थापक डी.एन.कृष्णमूर्तीलिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस कपंनीचे मुख्य व्यवस्थापक तपाश गुप्तापेट्रोलियम कर्न्झ्व्हेशन रिसर्च असोसिएशनचे पश्चिम विभागाचे संचालक देबाशिष चौधरी तसेच याक्षेत्रात काम करणारे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.