नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया अण्वस्त्रांच्या वापरात पुढाकार घेणार नाही, मात्र माझ्या देशावर मारा झाला तर प्रतिकार म्हणून विनाशकारी शस्त्रांचा वापर करणार असल्याचा व्लादिमीर पुतिन यांनी इशारा दिला आहे. ते काल रशियाच्या मानवी हक्क अधिकार परिषदेत बोलत होते. युक्रेनमधलं विशेष लष्करी अभियान वेळखाऊ प्रक्रिया असल्याचं ते म्हणाले.
जगभरात अण्वस्त्रांचा धोका वाढत आहे. आणि या धोक्यावर पांघरुण घालणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी मांडलं. रशियाकडे जगातले अत्याधुनिका अण्वस्त्र हत्यारं आहेत, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. मात्र त्याचा वापर केवळ संरक्षणासाठी केला जाईल. यावर त्यांनी भर दिला.