मुंबई (वृत्तसंस्था) : दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी एका वर्गात २५ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था ठेवण्याची सूचना शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. या परीक्षेचं वेळापत्रक निश्चित झालं असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु होणार आहे. राज्यभरातील आठ हजार केंद्रांवर सुमारे ३० लाख विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके नेमली जाणार असून, विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करून तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असं आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केलं आहे.