नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना युतीवर विश्वास दर्शवल्याबद्दल भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी जनतेचे आभार मानले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं महाराष्ट्रात जी प्रगती केली आणि जनसेवा केली. त्याचचं हे फलित असल्याचं शहा म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं त्यांनी अभिनंदन केलं. भाजपाला हरियाणात सर्वाधिक जागा मिळवून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले.