नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण भारतात धनतेरस आणि वसू बारस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. धनतेरसला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी त्रिदोशी, असं देखील म्हणतात. धनतेरस आणि वसू बारस एकाच दिवशी साजरा करण्याचा योग बऱ्याच वर्षांनंतर येतो.

नवीन वस्तूंची, विशेषतः सोनं, चांदी खरेदी करण्यासाठी आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी गृह तसंच वाहन खरेदीला देखील पसंती दिली जाते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व जनतेला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळीच्या सणानिमित्त गृह सजावट, कपडे, फराळाचे जिन्नस तसंच फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दीही दिसून येत आहे.