नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपटांमध्ये प्रादेशिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय असा कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट सर्व सीमा पार करून प्रेक्षकांच्या मनाला भिडतो, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.
ते आज मुंबईत सुरु होणाऱ्या एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदत बोलत होते. यंदा भारत जी-२० अध्यक्षपदा बरोबर शांघाय सहकार्य संघटनेचं अध्यक्षपद देखील भूषवत आहे, त्यामुळे २०२३ हे वर्ष महत्वाचं असल्याचं ते यावेळी म्हणाले.