मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासुन सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे ज्वारी, मका, कपाशी आणि  इतर खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले असून  शेतकरी हवालदिल झाला आहे.

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर व्हावे अशी जोरदार मागणी शेतकरी करीत आहे. एकंदरीत ९० टक्के खरीप हंगामाचं पावसामुळे  नुकसान झालं  आहे. याशिवाय परतीचा पाऊस लांबत असल्यानं रब्बीच्या पेरण्यासुद्धा लांबणीवर पडल्या आहेत.त्याचा परिणाम बाजारपेठेवर सुद्धा जाणवत आहे.

नांदेड जिल्ह्यातील मारतळा कापशी परिसरात मागील सहा सात दिवसापासून सतत पाऊस होत आहे. या पावसामुळे संकरित ज्वारी काळी पडली आहे. तर ज्वारीच्या कणसाला मोड उगवले आहेत.  हिंगोलीत कळमनुरी इथं झालेल्या वादळी पावसामुळे केळी पीकांचं मोठं नुकसान झालं आहे.