मुंबई (वृत्तसंस्था) : प्रकाशाचा आणि आनंदाचा दीपावलीचा उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा साजरी केली जात आहे. या दिवसाला दिवाळी पाडवाही म्हटलं जातं.

आजच्या दिवशी पत्नी पतीला औक्षण करुन, आपल्या नात्याची वीण घट्ट करते. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीनं व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. तुळजापूरच्या तुळजा भवानी मंदिरात विशेष पूजा केली गेली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेले अलंकार देवीला घातले गेले आहेत. याच दिवसापासून मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत सुरु होते.