नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ३ कुस्तीपटूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहेत.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ६५ किलो वजनीगटात भारताच्या शरवणनं कझाकिस्तानच्या रिफात सायबातालोव्ह याला ८- ६ असं पराभूत केलं, तर ९७ किलो वजनी गटात आकाश अंतिल यानं चीनच्या ली शू याला १०-० ने हरवलं. या दोघांसोबत वीरदेव गुलीयानंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

औउपांत्यपूर्व फेरीत आकाश अंतिलची लढत युक्रेनच्या दानायलो स्तासियुक याच्यासोबत होणार आहेत.