नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागा, त्या जागांसाठी दिव्यांगतेच्या प्रमाणा- बाबतच्या नमूद निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारांना घेऊन लवकरच भरल्या जाणार आहेत.

यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर इतर दिव्यांगतेच्या निकषात न बसणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची नियुक्ती केली जाणार नाही, असंही रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. अशा सर्व जागा पुढच्या वेळच्या कर्मचारी भरतीच्या अधिसूचनेत गृहीत धरल्या जातील, असंही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे.

दिव्यांगासाठी राखीव असलेल्या जागांसाठीच्या भरतीप्रक्रियेत अनियमितता होत असल्याच्या मुद्यावरून नवी दिल्ली इथं दिव्यांग व्यक्तींनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर रेल्वेनं हे प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.