नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हंगेरीच्या बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या रविंद्र यांनं 61 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
रविंद्र यांनी हंगेरीच्या मार्केल बुडाई कोवाक्सला 12-1 नं हरवलं. त्यानं 2019 रशियन नॅशनल फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिनिस्लाव तख्तारोव याला 11-0 नं हरवून कांस्य पदकात आपल्या विजयाची श्रृंखला कायम ठेवली आहे.