मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्र्वादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेतेपदी ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली. मुंबईतल्या पक्ष कार्यालयात अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विधीमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत अजित पवार यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांड़ला. तर धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. यावेळी अजित पवार यांनी पुन्हा जोमानं काम करणार असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सहयोगी काँग्रेस पक्षासह राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षांची भूमिका बजावेल आणि राज्यातल्या जनतेने दिलेला कौल शिरोधार्थ मानेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
सरकार स्थापनेसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेनेला पाठिंबा देऊ शकेल, असे अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांचं हे प्रतिपादन महत्वाचं मानलं जात आहे.