नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UGCअर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या थेट भरतीसाठी नेट, सेट किंवा SLET हे किमान निकष ठरवले आहेत. एका अधिसूचनेत यूजीसीनं असंही म्हटलं आहे की, सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी आवश्यक असलेली पीएच.डी. ही शैक्षणिक पात्रता या महिन्यापासून ऐच्छिक असेल. यापूर्वी २०२१ मध्ये आयोगाने, या वर्षीच्या जुलैपर्यंत सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी पीएच.डी. अनिवार्य नसल्याचं म्हटलं आहे.