नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. भारतीय संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत असलेल्या बिर्ला यांनी उलान बातोर इथं राष्ट्रपती उखनागीन खुरेलसुख यांची भेट घेतली , त्यावेळी ते बोलत होते.
बौद्ध धर्माचा सामायिक वैभवशाली वारसा दोन्ही देशांमधल्या संबंधांना अधोरेखित करतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगोलियाच्या राज्य भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले असून, मंगोलियाच्या आर्थिक विकासात भारत हा विश्वासार्ह भागीदार असल्याचं त्यांनी नमूद केलं.