मुंबई : राज्यातील महाराष्ट्र होमगार्ड सैनिकांना आता १८०दिवस काम दिलं जाईल त्यासाठी साडे तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली. रासपचे महादेव जानकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
आता होमगार्डसना दर तीन वर्षांनी नोंदणी करण्याची करण्याची आवश्यकता नाही, ही अट शिथिल करण्यात आली आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. होमगार्डसना कवायत भत्ता देखील मंजूर केला जाईल , असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.