नवी दिल्ली : पृथ्वीची देखभाल आणि संरक्षणासाठी देशात अनेक पर्यावरण संरक्षक उपक्रम राबवले जात आहे. पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. जी 20 देशांच्या ECSWG अर्थात पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गट तसंच पर्यावरण आणि हवामान खात्याच्या मंत्र्यांच्या चौथ्या बैठकीचा आज चेन्नईत समारोप झाला.
या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. या बैठकीला सदस्य देशांचे तसंच निमंत्रित देश आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनाचे मिळून सुमारे 300 प्रतिनिधी या तीन दिवसीय बैठकीत सहभागी झाले होते.