नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान -3 मधल्या विक्रम लँडरच्या चॅस्टे पेलोडनं चंद्रावरच्या तापमानाविषयी नोंदवलेली पहिली निरीक्षणं इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संस्थेनं जारी केली आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर दोन सेंटीमीटरच्या, तर पृष्ठभागाखालीलआठ सेंटीमीटरपर्यंतच्या नोंदी या पेलोडनं नोंदवल्या आहेत. त्यानुसार चंद्रावरचं तापमान कमाल ५६ अंशांपर्यंत, तर किमान उणे १० अंशापर्यंत नोंदवलं गेलं आहे.