नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर आणि लद्दाखच्या पर्वतीय आणि मैदानी भागात येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
जोजिला खिंड, श्रीनगर-जम्मू, लेह-मनाली राजमार्ग आणि मुगल रोड इथं तापमानात घट होऊन जोरदार बर्फवृष्टी होऊन, रस्ते मार्गाची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली आहे.
कश्मीर प्रशासन विभागानं काश्मिर विभाग आणि लद्दाख करता हिवाळ्यात उपयुक्त अन्नसाठा आणि इतर आवश्यक वस्तूंच्या साठ्याचा आढावा घेतला.