‘उमेद केअर सेंटर’ला वऱ्हाडकारांचा ‘एक हात मदतीचा’ लेखक-दिग्दर्शक अमोल खापरे व चमूचा उपक्रम

पूणे : हसणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे आपण नेहमीच ऐकतो. पण हसण्यासाठी काहीतरी निमित्त असणे ही गरजेचे असते. उगाच हसणे म्हणजे चर्चेला उधाण देणे. मग आता उगाच नही पण खळखळून हसविण्यासाठी आपल्या गावात, आपल्या शहरात ‘वऱ्हाडकार’ ची चमू येत आहे. ‘वऱ्हाडकार’ निर्मित ‘वऱ्हाड आलयं लंडनहून’ या विनोदी नाटकाचा बुधवार, 13 नोव्हेंबर रोजी रौप्य महोत्सवी प्रयोग सादर होत आहे. स्थानिय बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री 9 वाजता हास्य आणि विनोदाची धमाल मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘वऱ्हाड आलयं लंडनहून’ या नाटकाची पायाभरणी तब्बल दोन वर्षापूर्वी झाली. मागील दो वर्षांमध्ये झालेल्या 24 प्रयोगांच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी ‘वऱ्हाडकार’शी आपले नाते जोडले. रंगभूमीच्या मातीत लेखक व दिग्दर्शक अमोल खापरे व चमूने रोवलेले हे बीज आता रोपटे झाले असून आपला 25वा प्रयोग सादर करीत आहे. या प्रयोगासंदर्भात लेखक व दिग्दर्शक अमोल खापरे म्हणाले कि रौप्य महोत्सवी नाटकाचा प्रयोग सादर करणे, हा प्रत्येक कलाकारासाठी एक आनंदाचा क्षण आहे. या नाटकाच्या माध्यमातून एकत्रित होणारी रक्कम ही येथील ‘उमेद केअर सेंटर’ जेथे आपल्या कुटूंबापासून दुर असणाऱ्या आबाल-वृद्धांचे वास्तव्य आहे. त्यांना वऱ्हाडकारांचा ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत उमेद सेटरला आवश्यक असणाऱ्या वस्तु दिवाळीची भेट म्हणून देण्यात येईल. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी 13 नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिरात होऊ घातलेल्या रौप्य महोत्सवी प्रयोगाचा आनंद घेत उमेद केअर सेंटरला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘वऱ्हाड आलयं लंडनहून’ या नाटकात सह दिग्दर्शक म्हणून राहुल राठोड, सतिश वराडे, संगीत संतोष चौधरी, नेपथ्य आकाश नवघरे, प्रकाश राजेंद्र खामकर, रंगभूषा महेश पाखरे, विशाखा साळुंखे, केशभूषा विजया क्षीरसागर यांची आहे. याशिवाय मयुर मोरे, स्नेहा मांडवे, नेहा कदम, किरण नेवारे, विजय काथवटे, सुरज टक्के, गणेश खाटपे, अमित रोडे, प्रसाद रणदिवे, सनी भोरडे, महेश पाटील, मंगेश शेळके, महेश पाखरे, मनोज चौधरी, गणेश जी. आदित्य घडे, प्रिती जगम, समृद्धी दंडगे, राहुल राठोड यांच्यासह अमोल खापरे व नीरज सुर्यकांत विविध भूमिका साकारतांना दिसणार आहेत.