नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीख धर्माचे पहिले धर्मगुरु गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त पंजाबसह देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

अमृतसर इथं ध्वनि आणि प्रकाशाच्या साहाय्यानं दाखवलेल्या गुरु नानक देव यांच्या जीवनावर आधारित एका कार्यक्रमाचं उद्घाटन, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल झालं.

तत्पूर्वी सुलतानपुर लोधी इथं भरवलेल्या श्री. गुरु नानक देवजी यांच्याशी संबंधित प्रदर्शनाचं उद्धाटन, प्रकाश जावडेकर आणि केंद्रीयमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते झालं.