नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे फुझोऊ इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना इंडोनेशियाच्या मार्कस फर्नाल्डी गिडियोन आणि केविन संजाया सुकामुल्जो या जोडीशी होणार आहे.

या भारतीय जोडीनं काल उपांत्यपुर्व फेरीत चीनच्या ली जुन हुई आणि लियु यू चेनचा २१-१९,२१-१५ असा पराभव केला.