नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे.

या खात्याचा अतिरिक्त कार्यभार माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवला आहे. अरविंद सावंत यांनी काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.