पुणे : महाराष्ट्र शासनाने संदेश प्रसार धोरण २०१८ (जाहीरात वितरण धोरण ) जाहीर करताना त्यात अत्यंत जाचक अटी व नियम समाविष्ट केले आहेत. त्यात दुरुस्ती करून शुद्धीपत्रकाव्दारे सुधारणा करण्यासाठी आणि सन २००१ पासून सातत्याने मागण्यांचा पाठपुरावा करून सुद्धा शासनाने जाहीर केलेल्या जाहीरात वितरण धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शासनांमार्फत जाहीरात वितरक संस्थांना त्वरित आदेश दयावेत.

या रास्त मागणीसाठी राज्यातील जिल्हा स्तरावरच्या जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हाधिकारी, विभागीय स्तरावरील विभागीय माहिती संचालक / उपसंचालक, विभागीय महसूल आयुक्त यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन पुन्हा एकदा सादर करण्याचे महाअभियान शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०१९ या राष्ट्रीय प्रेस दिनी राबविण्यात येणार आहे.

अस्मानीचे सर्व सदस्य आणि त्या त्या पातळीवरचे पदाधिकारी यांनी त्या त्या स्तरावरील उपरोक्त कार्यालयावर मोर्चाने जाऊन सर्व जिल्हात निवेदन देण्याचे महाअभियान यशस्वी करावे असे आवाहन अस्मानीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.आप्पासाहेब पाटील यांनी केले आहे.